तुमची जाहिरात या इथे कितीही दिवसांसाठी

३६५ दिवसांत या संकेतस्थळाला ला १०००० लोक भेट देतात. त्यामुळे आपण जर या इथे जाहिरात दिलीत तर त्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. जाहिरात मग ती कशाचीही असू शकते. पुस्तक, तुमचे स्वतःचे संकेतस्थळ, टुलबार, उत्पादने इ. इ. संपर्क - onlinemailme@gmail.com

आभास उरावे

एका पानावर लिहिलेली कविता तर मला आठवत आहे, पण पान कुठे आहे? हे मात्र काही आठवत नाही. आता त्यासाठी कागदांचा सारा मोठा पसारा आवरत बसावा लागणार, आणि मला वाटत नाही सध्या तितका उत्साह आणि वेळ मला आहे... पण तरीही ही एक काही महिन्यांपूर्वी लिहिलेली कविता आज सापडली.
----------------------------------------------

त्या क्षणाला त्या क्षणानेच जाणावे
नंतर फक्त केवळ आभास उरावे

आता आठवत नाही,
पण त्या ता-यांनाही, मी काही मागितलं होतं
चालताना रस्त्यांनाही, काही सांगितलं होतं
ते तारेही आता, चालून गेले असतील
त्यांच्याकडेही ‘त्या’ ईच्छा उरल्या नसतील

त्या मनाला त्या मनानेच जाणावे
नंतर फक्त केवळ आभास उरावे

आता आठवत नाही,
पण त्या रात्रींनाही मी आश्वासिलं होतं
वाट पाहत्या नेत्रांनाही, सावरलं होतं
त्या रात्रींनीही आता, डोळे मिटले असतील
त्यांच्याकडेही ‘ती’ स्वप्ने उरली नसतील

फक्त एक

सर्वकाही चांगलं झालं
हा मोकळा श्वास सांगतोय
आता हे सारं आकाश
उडण्यासाठी मोकळं आहे

मला उपदेश द्यायचा नाही
काही सांगायचंही नाही
मला फक्त मी रहायचं आहे.

आगतीक होऊ नकोस
रडू नकोस
हे तर केवळ
‘जीवन’ आहे
फक्त एक ‘जीवन’

मला जरा हात देशील का?
या क्षितिजापार जायला!
असं ऎकलंय
पलिकडे स्वप्नसृष्टी आहे
जायचंय पहायला

म्टटलं, ‘पाच वर्ष आहेत अजून’
स्वप्नातीत स्वप्नं पाहिली
असं म्हणून
पाहतोय तर ती वेळ कधी आली
हे कळलंच नाही,
स्वतःला सिद्ध करायची...

आता हवं ते मिळालंय
आनंदात सामावून जायचंय
हे तर केवळ
‘जीवन’ आहे
फक्त एक ‘जीवन’

--------------------------------------------------
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

बाकी बोलायचं झालं तर... टुलबार पाहिलात का तुम्ही??? जर नसेल पाहिला तर जरुर पहा. आपल्याला तो आवडेल याची मला खात्री आहे.

हे चल ऊठ!

निघावंच लागेल, हे चल ऊठ
लवकर फ्रेश हो
आणि या कपाळावर आठ्य़ा कसल्या?
मनातली चित्रं बाजूला ठेव
आता काय करायचं ते लक्षात ठेव
घड्याळाचे काटे पाहिलेस का?
चल मग आता एक एक पाऊल ठेव

विश्वास कसा बसेल?
तो इथं कसा असेल?
आकाशातले तारेही रडतात
जेंव्हा स्वप्ने मरुन पडतात

परमेश्वरा मला तुझ्यात सामावून घे
हॄदयात, आत्म्यात सामावून घे

विश्वास कसा बसेल?
तो इथं कसा असेल?
आकाशातले तारेही रडतात
जेंव्हा स्वप्ने मरुन पडतात
---------------------------------------------------
आजच्या दिवसासाठी अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा! :-)

 
© 2008 *By Templates*