एका english गाण्याच्या चालीवर (फक्त चाल!) लिहिलेली कविता. मला माहित नाही तुम्हाला आवडेल की नाही? पण मी तर अशीच लिहिली आहे. आणि खरं तर माझं मनोगत किंवा माझे विचार मला यावेळी मांडायचे होते...पण आता सध्या तरी वेळ नाहिये. कदाचीत थोड्या दिवसांनी...पण मला खात्री आहे तुम्हाला वाचायला आवडेल.
‘ती’ ची आवड
मला नाही निवड
ती बघेल सवड
मला राहिल ओढ
सांग आज क्लासनंतर
तू थांबशील ना?
थोडं बोलूयात ना

मी बोलताना तू
छान हसशील ना?
थोडं लाजशील ना!
तेंव्हा लपवेन मी
धडधडतं हृदय
त्याला ती सवय
आणि असं करताना
मी वाटेनच मूर्ख
हो! आहेच मूर्ख
मी नाही ग असा कोणीही
ज्यास लागतील लिहिण्यासाठी
काही अवघड ओळी

‘ती’ ची आवड
मला नाही निवड
ती बघेल सवड
मला राहिल ओढ
तुला दिसत नाही?
आहे इथे मी ही
मनात ऎकलं मी
तू न बोलताच,
‘नाही, नाही, नाही...’

तुला आठवतं!? मी-
समोर उभा होतो
हंऽ थोडं दमलो होतो...
खरंच मला आवडतं जेंव्हा
तू असतेस समोर
बाकी दिवस बो॓ऽअर
तू निघून गेल्यावर
विचार तासंतास, समोर-
तुझाच आभास
मी नाही ग असा कोणीही
जो बोलू शकेल सर्वांसमोर
मनातील काही

‘ती’ ची आवड
मला नाही निवड
ती बघेल सवड
मला राहिल ओढ
तुला दिसत नाही
माझ्या हृदयात काही
मनात ऎकलं मी
तू न बोलताच
‘नाही, नाही, नाही...’
(पण हो म्हणशील :-)
-रोहन जगताप
