एकदा आणि पुन्हा पुन्हा

तुझ्या आठवणींच्या पलिकडे

शब्द पाहू कशात हे?
आठवी अस्तित्त्व तुझे
आभासी स्वप्नात दिसे

हरवलेली किरणे जशी
सूर्यही शोधतसे
चांदण्या रात्री या सांग
कशी त्यास मिळतील ते?

Add Image


गंध ह्या फुलातला
नेई दुर वारा नी
ना काहीही क्षणी
फुलाजवळ दिसतसे

मन पार करी अंतरे
मग येई साद, ‘थांब रे!’
तिच्यासाठी एकदा
आणि पुन्हा पुन्हा

-रोहन जगताप

हे रोजचंच आहे जगणं


(एक लहानपणी लिहीलेली कविता... त्यामुळे समजून घ्या :-)

हे रोजचंच आहे जगणं
सुरक्षितपणे वागणं
कुठे बाँब, अपघात नी कुठे काही
बातमी-वर्तमानपत्राला घाई

हे देवा सांग तू
या विश्वात काय सुरक्षित
तू बनवलंस
आम्ही गमवलं

सूर्य खालून वर, वरून खाली
लोकं जातात- येतात माघारी
काय घेऊन? जीव मुठीत धरून
करायचं आहे आपलं कर्म

देवा तुझ्या प्रकाशाला
हा जसा ढग येतो आडवा
कधी कुठे त्याची सावली पडेल
काय सांगणार?

-रोहन जगताप

तुझ्यापुढे


मला स्वतःला आवडणा-या माझ्या कवितांपॆकी एक...


मन मानेल ना मानेल
पण शेवटी ते हारेल तुझ्यापुढे

थोडे दिवस असे काढले 
थोडे दिवस तसे काढले
मनाला आधार देत राहिलो
पण ते जुने आधारही...,
आता मागे पडले

तुझ्या छोट्या छोट्या गोष्टींचंसुद्धा
मला खुप कॊतुक होतं
आणि मी जे काही करत होतो
तेही वाटलं,
मनातलं एक दु:ख होतं

आजचा हा आणखी एक दिवस
सजेल ना सजेल
पण शेवटी तो मावळेल तुझ्यापुढे

- रोहन जगताप

 
© 2008 *By Templates*