तुमची जाहिरात या इथे कितीही दिवसांसाठी

३६५ दिवसांत या संकेतस्थळाला ला १०००० लोक भेट देतात. त्यामुळे आपण जर या इथे जाहिरात दिलीत तर त्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. जाहिरात मग ती कशाचीही असू शकते. पुस्तक, तुमचे स्वतःचे संकेतस्थळ, टुलबार, उत्पादने इ. इ. संपर्क - onlinemailme@gmail.com

असाच...

मी आहे असाच

रोज रात्री तारे पाहणारा
नभांतील स्वप्ने 
दूर विश्वात नेणारा

ओघळलेल्या पानातही
स्मृती जपणारा
आणि सायंकाळी रंगात 
हरवून जाणारा

स्वतःचेच मन मी
मनात लपवतो
झुळूक ही हृदयाची
हॄदयातच जपतो


मी आहे असाच
ढगांसोबत भरकटणारा
आणि त्या तिथे दूर
क्षितीजात उतरणारा

जुन्याच नात्यांमध्ये 
नाविण्य अनुभवणारा
हे भावविश्व रोज नव्या 
रंगाने रंगवणारा

माझा चेहराही माझे
दुःख लपवतो
चुकलेले अषॄ मी
एकांतात पुसतो


मी आहे असा़च
तुषारात तरंगणारा
छोट्याशा प्रवाहातही
मन विरघळणारा

इवल्याशा पातीचाही
विचार करणारा
कोवळ्या दवबिंदूंनी
तृप्त होणारा

माझा श्वासही मी
पाहत राहतो
आत्म्याच्या चॆतन्यातून 
देवालाही गाठतो

-रोहन जगताप (परतलो :-)

0 comments:

 
© 2008 *By Templates*