क्षणात संपलं(जेंव्हा)
जीवात अडकलेलं स्वप्न
जीव निघून गेला
हृदयात स्वप्नाचा स्पर्श
अडखळून पडला
श्वासाच्या सत्याबरोबर
ते स्वप्न आणि हृदय
जळू लागलं
खाऊन टाकणारी शांतता
नको नकोसा आवाज
पुन्हा उरलं चालत राहणं
भकास रस्त्यांवरुन त्याच
प्राणातून त्राण निघून गेला
अर्थाचा अर्थ निघून गेला
आशाही वेडी राहिली नाही
श्वासातला विश्वास निघून गेला
-रोहन जगताप
तुमची जाहिरात या इथे कितीही दिवसांसाठी
क्षणात
कवी रोहन जगताप 0 comments
Labels: marathi kavita, marathi poem, marathi prem kavita, Rohan Jagtap, क्षणात, मराठी कविता, मराठी प्रेम कविता, रोहन जगताप
फुलपाखरू

ब्लॉग... एक वर्ष पूर्ण!!!
समोर उडतं फुलपाखरू
हे निर्मळ प्रेम जणू
तू निरागस जीवनाची खरी साथ
नजर ही चोरताना तुला
समजत नाही?
कळणारच तुला...
तू लाजून समजावंस
इच्छा असावी
उमललेले फुल तनू
आणि जीवन स्मरण जणू
तू निमिष जीवनाची साठवण
नजरेच्या कोनामधून
कानोसा घे या हृदयामधून
तू अलगत सावरताना
मज सांगे ओढणी
जशी एक नाजूक तरू
निरागस, कोमल जणू
तू ‘अस्पर्श’ प्रेमाची हृदयातली वाट
नजरानजर होईल जशी
खाली तू बघताना अशी
मज ‘अबोल’ भाषेत
बोलतेस कशी!?
मनात येताना अशी
आणि मग जातेस कशी?
तू स्मृतीत उरलेली एक तहान
समोरून जाताना तुला
हृदयाने या स्पर्ष केला
या छोट्याशा जीवनाने
काही गुन्हा केला!?
मन अगदी तूच तू
तेही एक मृगजळ जणू
मज प्रेमास ग तू अफाट सागर
- रोहन जगताप
कवी रोहन जगताप 0 comments
Labels: marathi poem, marathi prem kavita, Rohan Jagtap, फुलपाखरू, मराठी कविता, मराठी प्रेम कविता, रोहन जगताप
सुंदर आठवणी

तुझ्या- माझ्या आठवणी
माझ्या कायम राहतील मनात
त्याच तर माझे जीवन
या जीवनात
प्रत्येक छायाचित्र आठवणींचे
काही देते आठवण करून
मग मी हळूच पुढचे बघतो
कसलासा विचार करून
हो कधीच नाही रहात
कुठलाही हातात हात
पण जीवनभर स्पर्श तो
हृदयाला देतो साथ
जेंव्हा आपण जवळ होतो
खरंच मला वाटलं होतं
तू माझी आताच.....
नंतर सुंदर आठवणींची
- रोहन जगताप
कवी रोहन जगताप 0 comments
Labels: marathi poem, marathi prem kavita, Rohan Jagtap, मराठी कविता, मराठी प्रेम कविता, रोहन जगताप, सुंदर आठवणी
अशाच एखाद्या संध्याकाळीही

मस्त वारा
थंड हवा
संध्याकाळ ही
छान किती!
वा-यासोबत
हलणारी पाने
त्यांची सळसळ
मधूऽर ही
विखुरलेले
रंगीत ढग
स्थिर त्या तिथे
आकाशी
त्यांच्याच नादात
त्यांच्या जीवनात
किलबिल पक्षी
न लहान प्राणी
निसर्ग हा
दाखवतो आहे
खरी प्रसन्नता
मनाची
ह्या मनात
खुलू दे
असाच आभास
जीवनात केंव्हाही
अशाच एखाद्या
संध्याकाळीही
- रोहन जगताप
कवी रोहन जगताप 0 comments
Labels: marathi kavita, marathi poem, Rohan Jagtap, अशाच एखाद्या संध्याकाळीही, मराठी कविता, रोहन जगताप
अनेक ठिकाणी

एकावेळी अनेक ठिकाणी
असतो प्रत्येकजण
त्याच्याच निराळ्या रूपात
स्वार्थी स्वरूपात
फायदा फायदा
आपले स्थान
अडकलेला
आपला मान
मनासारखं हवं असतं
पण निराळं मन
आधीच घडलेलं असतं
इतर काही
असेलही खरं
पण आपलं तेच
आहे बरं
कोणी पडलं यातून बाहेर
तर मिळतो त्याला घरचाच आहेर!
- रोहन जगताप
कवी रोहन जगताप 0 comments
Labels: marathi kavita, marathi poem, Rohan Jagtap, अनेक ठिकाणी, मराठी कविता, रोहन जगताप
