
आकाश येत नाही खाली स्वतःहून
जमिनीवरील मलाच
जावं लागेल त्याच्यापर्यंत
अनेक अडथळे चुकवत
लवकरात लवकर, जमेल तेव्हढ्या
जर आधीच असते माझे घर
सुंदर अशा ढगांमध्ये
किंवा एखाद्या उंच अशा शिखरावर
तर मग तो माझा असला असता शेजारीच
माझ्या अनेक कल्पनांत
तो माझ्या शेजारीच असतो
पण मी तर आहे जमिनीवरच
घेऊन सुंदरसे पंख
जावं लागेल उडून तिथं
आवाज आला कानी...
‘पण जेंव्हा तू त्याला गवसणी
घालशील, तेंव्हा मात्र
आपले पंख हलवण्यास विसरू नको’
- रोहन जगताप
तुमची जाहिरात या इथे कितीही दिवसांसाठी
आकाश येत नाही
कवी रोहन जगताप 0 comments
Labels: marathi kavita, marathi poem, Rohan Jagtap, आकाश येत नाही, मराठी कविता, रोहन जगताप
तुझ्या शब्दांनी

तुझ्या शब्दांनी हृदयात माझ्या
बांधले तोरण
त्यात आहे जणू रूप गं तुझे
स्पंदनांचे स्मरण
समोर प्रत्यक्षात
आणि त्या तिथे आकाशात
नक्षत्रांचे प्रतिबिंब
नक्की पडले आहे कशात?
ना भावनांना येईल माझ्या
कधीही मरण
त्यात आहे जणू रूप ग तुझे
चिरकाल जीवन
मनाने गुंफले विचार
तुझ्या माळेत
माझ्या मनाचे मनही तुच
सोनेरी मनात
नाव जीवनाला जीवन तुझे
तुझेच ते क्षण
तुझ्या शब्दांनी हृदयात माझ्या
बांधले तोरण
- रोहन जगताप
कवी रोहन जगताप 0 comments
Labels: marathi poem, marathi prem kavita, Rohan Jagtap, तुझ्या शब्दांनी, मराठी कविता, रोहन जगताप
सुंदर रंगसंगती

तुझ्या एका कोप-यात
माहित आहे तुला
आयुष्याचा तू
सुटलेला एक बाण
या अशातशा
एका जगण्यामध्ये
जीवंत तू आहेस
त्यात रोजच्याच
काही गोष्टी
नेहमीच्याच, अनंत प्रकारच्या
सुखदुःखाच्या
‘ह’ रंग आयुष्याचे
भरावेच लागणार जीवनात
पण सुंदर सजेल हे
जीवन जेंव्हा
निवडशील मनापासून तू
एक सुंदर रंगसंगती
स्वतःसाठी
- रोहन जगताप
कवी रोहन जगताप 0 comments
Labels: marathi kavita, marathi poem, Rohan Jagtap, मराठी कविता, रोहन जगताप, सुंदर रंगसंगती
सुरुवात

सुरुवात ही-
माझी सुरुवात
अस्पष्ट ती
इथून तिथून
नेमकी कुठून
माझी सुरूवात
माहित नाही
उगवला सूर्य
किती वाजता
त्या नारंगी ढगांना
माहित नाही
नेमका कोणत्या वेळी
ओरडला?
त्या कोंबड्यालाही
माहित नाही
अशी ही सुरूवात
अस्पष्ट ती
जणू एखादं
मृगजळ!!!
- रोहन जगताप
कवी रोहन जगताप 0 comments
Labels: marathi kavita, marathi poem, Rohan Jagtap, मराठी कविता, रोहन जगताप, सुरुवात
पण माझ्यासारखं

पोकळ दिवस संपला
रात्रीचा प्रश्न उरला
तू गेलीस सोडून
आणि जन्मच हारला
थोड्या गर्वानेच मी म्हणतोय
असं समज हवं तर...
पण माझ्यासारखं पुन्हा तुला मिळणार कोण?
हताश वारे वाहिले
या घरासमोरून
वाहिलीही स्वप्ने
गेलेली विरून
माझ्या समाधानास मी म्हणतोय
असं समज हवं तर...
पण माझ्यासारखं पुन्हा तुला मिळणार कोण?
एवढं मोठं आकाश
गेलं हे झाकोळून
रात्रीही गेल्या
त्यांचं अस्तित्त्व विसरून
नको म्हणायला ते म्हणतोय
असं समज हवं तर...
पण माझ्यासारखं पुन्हा तुला मिळणार कोण?
थोड्या गर्वानेच मी म्हणतोय
असं समज हवं तर...
पण माझ्यासारखं पुन्हा तुला मिळणार कोण?
- रोहन जगताप
कवी रोहन जगताप 0 comments
Labels: marathi poem, marathi prem kavita, Rohan Jagtap, पण माझ्यासारखं, मराठी प्रेम कविता, रोहन जगताप
आमचे तर
आमचे तर चालले आहे असेच
कधी अबोला
कधी जिव्हाळा
संवाद वाटतो, तरी असतो?
मनमोकळा!
खरंच अबोला, खरंच जिव्हाळा
की केवळ आमचा
कृत्रीम पावसाळा?
आमचे तर...
कधी खांद्यावरती हात
कधी मनावरती लाथ
तर कसली ही आहे?
आमची साथ!
खरंच हात, खरंच लाथ
की उगाचच आपली एक
मनाची बात
आमचे तर...
कधी असे
कधी तसे
कधी असेतसेही
पण असते कधी?
जसे आहे तसे!
खरंच असे, खरंच तसे
की गरज त्या त्या
वेळेपुरती...!?
- रोहन जगताप
कवी रोहन जगताप 1 comments
Labels: marathi kavita, marathi poem, Rohan Jagtap, आमचे तर, मराठी कविता, रोहन जगताप
मला जीवन दिसावं

कधी वाटतं...
आपण दोघंच आसावं नी
अगदी कुणीही नसावं...
प्रत्येक शब्दातून तुझ्या
मला माझं विश्व दिसावं
रोज असतेस समोर तरीपण
एकटीच नाही कधीही
रोज दिसतेस समोर तरीपण
एक हृदय नाही कधीही
जातील एक एक दिवस
मग रात्रींनाही घाई
हरवून जातील क्षणही
राहून न जाईल काही
आहे मला ही जाणीव
म्हणूनच उदास मन हे होई
अन सावरण्यास त्याला
बघ ना इथे कोणीही नाही
म्हणूनच कधी वाटतं
आपण दोघंच आसावं नी
अगदी कोणीही नसावं
प्रत्येक शब्दातून तुझ्या मग...
मला जीवन दिसावं
- रोहन जगताप
कवी रोहन जगताप 0 comments
Labels: marathi poem, marathi prem kavita, Rohan Jagtap, मराठी प्रेम कविता, मला जीवन दिसावं, रोहन जगताप
किती!!!

अनेक नजरांत
अनेक मनांत
मी वेगवेगळा किती!
अरे देवा! ह्या धरतीवर
मी रूपांत नेमका किती!
कुणाकुणाला कसेकसे
माझे हे रुप ते भासे
स्वतःस मजला माझी
अस्पष्ट आकृती दिसे
समोरील मायाजालात या
मी स्वतःस ओळखू कसा?
तो मीच खरा आहे का?
जो हा दाखवतोय आरसा
कुठेकुठे नी कसाकसा
मी उमटविला माझा ठसा
भटकताहेत ते सर्वही आता
शोधत आपली दिशा
- रोहन जगताप
कवी रोहन जगताप 0 comments
Labels: marathi kavita, marathi poem, Rohan Jagtap, किती, मराठी कविता, रोहन जगताप
कधी कधी

कधी कधी
तू मला आठवतेस कशी?
कधी कधी
मी स्वतःतच गुंततो कसा?
मनात या...
मला दिसे तुझे रुप
पण आता
त्या गोष्टीला झाले दिवस खूप
जेंव्हा मी गेलो
काही (शेवटचं) बोलून
प्रत्येकवेळी
विस्मरणाचा प्रयत्न
प्रत्येकवेळी
तू समोर येतेसच कशी?
सांग ना...
तुला मी आठवत नाही?
आहे मनात
या बाकी काही?
जेंव्हा मी गेलो
काही (शेवटचं) बोलून
- रोहन जगताप
कवी रोहन जगताप 0 comments
Labels: marathi poem, marathi prem kavita, Rohan Jagtap, कधी कधी, मराठी प्रेम कविता, रोहन जगताप
इथून दूरवर

हवा होती थंड
सभोवताली प्रकाश मंद
निवांत रस्त्यावरुन
एकटंच चालताना
वाटेवरील एक छोटा दगड
मारला मी पायाने
तो गेला ठेचकाळात पुढे
जमिनीशी कुठे?
माझे मन हे
विरघळले त्यात
ते मला सोडून
हरवले कुठे?
लागली ही ठेच तुला
सांग मला कशाची?
कोणत्या भावना तुला
सोडताहेत दूर आकाशी?
तो एक छोटा दगड जसा
जाऊ नकोस
या जमिनीवरून
ठेचकाळत इतरांशी
जा तू या हवेतून
मस्त नी मनसोक्त
घे भरारी दूरवर, इथून
सर्वांपासून
- रोहन जगताप
कवी रोहन जगताप 0 comments
Labels: marathi kavita, marathi poem, Rohan Jagtap, इथून दूरवर, मराठी कविता, रोहन जगताप
त्याच्या आयुष्याला तरी

काही ओळी तुझ्यासाठी लिहीलेल्या
काळाच्या ओघात दूर दूर गेलेल्या
आता माझ्या मनात अशाच आल्या
आणि मला त्या तिथे घेऊन गेल्या
हं... पण मी तेंव्हाच होतं जाणलं
म्हणूनच एकांतात,
छोट्याशा कागदावर लिहिलं...
‘भरकटेल तो अवखळ वा-यामध्ये अडकून
उंच उंच माझ्या हातातून
माझ्या जीवनावरून’
जसा एखादा संदेश घेऊन
सोडलेला बलून
रहावी माझी आठवण
मलाच म्हणून
कधी वाटतं मला माझ्या मनाशीच
वा-याने न्यायला हवं होतं त्याला
फक्त एकदाच बोलण्यासाठी तुझ्याशी
अर्थहीन आयुष्यातील
असला तो कागद जरी
हवा होता अर्थ त्याला
त्याच्या आयुष्याला तरी
- रोहन जगताप
कवी रोहन जगताप 0 comments
Labels: marathi poem, marathi prem kavita, Rohan Jagtap, त्याच्या आयुष्याला तरी, मराठी प्रेम कविता, रोहन जगताप
स्वप्नांमध्ये

स्वप्नांमध्ये रंगलो
तिथेच मी दंगलो
हा सर्व मूर्खपणा
मी कळून चुकलो
विचार विचार नी
विचारच करत राहिलो
जमिनीवरुन चालताना
क्षितीजाकडे पहात राहिलो
भोवताली दाट धुक्यामध्ये
ढगांना शोधत राहिलो
शोधत शोधत नी
शोधतच राहिलो
स्वप्नांमध्ये रात्री मी
फुले उमलतांना बघितली
नी पहाटे पहाटे
मला गाढ झोप लागली
झोपत झोपत नी
झोपतच राहिलो
- रोहन जगताप
कवी रोहन जगताप 0 comments
Labels: marathi kavita, marathi poem, Rohan Jagtap, मराठी कविता, रोहन जगताप, स्वप्नांमध्ये
मन हे काचेचं

माझ्यात आता
माझी बाजू मांडण्याची
ताकद नाही...
मी अपेक्षाच का ठेवू?
स्वतःचा अपेक्षाभंग
करण्याचीही इच्छा नाही
माझ्यात आता
तेच क्षण पुन्हा जगण्याची
ताकद नाही...
एक प्रेम मीच का करू?
स्वतःचं हृदय
तोडण्याचीही इच्छा नाही
मी तुला का समजावं?
तू मला समजावंस
असंही आता वाटत नाही
माझं मन हे काचेचं
असंख्य तुटलेलं
न रुतावी तुज म्हणून
दिलेलं दूर कच-यात फेकून
- रोहन जगताप
कवी रोहन जगताप 1 comments
Labels: marathi poem, marathi prem kavita, Rohan Jagtap, मन हे काचेचं, मराठी कविता, मराठी प्रेम कविता, रोहन जगताप
मी गाठतो स्वर्गही...

मी सुतावरून, स्वर्ग गाठतो
मग स्वतःलाच, तेथून ढकलून देतो
आपल्याला झेलणार कोणीच नाही
या जाणीवेतूनच पॅराशूट उघडतो
मी वाळवंटात, पाण्यामागे धावत सुटतो
भुगोलातील मृगजळही समजून चुकतो
आसपास कोणी नसल्याची करून खात्री
मग ते मृगजळही पिऊन टाकतो
- रोहन जगताप
कवी रोहन जगताप 0 comments
Labels: marathi kavita, marathi poem, Rohan Jagtap, मराठी कविता, मी गाठतो स्वर्गही..., रोहन जगताप
नजर
प्रत्येकाची नजर ही प्रत्येकाकडे
प्रत्येकास ती भासे स्वतःचकडे
मलाही वाटली ती तुझी तशीच
मी म्हटलं आपलं वेड्या मनाशीच
फोटो चिटकवलेला या भिंतीवर
त्याचीही नजर सतत माझ्यावर
अर्थहीन त्या निर्जीव नजरेतून
हं... घेतलं मी स्वतःलाच पाहून
-रोहन जगताप
कवी रोहन जगताप 0 comments
Labels: marathi poem, marathi prem kavita, Rohan Jagtap, नजर, मराठी कविता, मराठी प्रेम कविता, रोहन जगताप
सांगण्यासारखं

सांगण्यासारखं काही नाही
सांगण्यासारखं खूप काही
जीवन मुकं हे वाटेल पण
बोलण्यासारखं खूप काही
अनाकलनीय जीवनात या
गुंतून गेलंय मनही
दुर्लक्षित कोप-यांतील क्षणांमधून
जगण्यासारखं खूप काही
सुख दिसेल फार मोठं
कधी दिसणार नाही काही
खूप खोल निराशेची खाई
अवकाशाला सिमा नाही
कितीही प्रयत्न केला जीवाने
जीवन बोलून सांगू शकत नाही
ओठांमागील शब्दांचा आवाज
अंतःकरणात घुमत राही
-रोहन जगताप
कवी रोहन जगताप 0 comments
Labels: marathi kavita, marathi poem, Rohan Jagtap, मराठी कविता, रोहन जगताप, सांगण्यासारखं
जिथं असशील तू

असं वाटतं आता
ही थंडीच पांघरून घ्यावी
गारगार हवेत अलगत उडावं
काळोख्या अवकाशातून
सृष्टीस बघावं
अन मग हळूच यावं
जिथं असशील तू
खरंच आत्ता, काय करत असशील तू?
...यावं जिथं असशील तू...
-रोहन जगताप
कवी रोहन जगताप 0 comments
Labels: marathi poem, marathi prem kavita, Rohan Jagtap, जिथं असशील तू, मराठी कविता, मराठी प्रेम कविता, रोहन जगताप
