मी चाललो होतो... फिरायला
(आणि त्या निमित्ताने काही आणायला)
दिवस होता सुंदर नी-
‘असंच’ काहिसं मनात
छानसा रस्ता सजलेला, हिरव्या बाजूंनी
फुलपाखरे खेळत होती, भोवताली रंगांनी
मी हसत बघितले डोळ्यांनी
या माझ्या मित्रांना...
एवढ्यात एक छोटेसे फुलपाखरू,
गेले माझ्या भोवती बागडून
हं...कदाचीत त्यावेळी-
माझं मनच गेलं होतं फुलून
ऎकू येत होती, सळसळ पानांची
लागली होती थंड, चाहूल वा-याची
वा-याचा झोत स्पर्शून गेला
हिरव्या ढगांना... नी
मी संपूर्ण भोवताली अनुभवली
हेलावत्या, पिवळ्या
पानांची... रिमझिम
-रोहन जगताप
रिमझिम
कवी * रोहन जगताप 0 comments
Labels: marathi kavita, marathi poem, Rohan Jagtap, मराठी कविता, रिमझिम, रोहन जगताप
तू सहजच

तू सहजच बोलून जातेस
तू सहजच हसून जातेस
दुस-या दिवसाची प्रतिक्षा
मात्र मलाच लागून राहते
धडधड या हृदयाची
थांबता थांबत नाही
तुझ्यासाठी जगण्यासाठी
मी थांबवतही नाही
कधी नकळत फुलांमधूनी
भ्रमर बनून जाताना
हा हवेत दरवळणारा
मन सुगंध झेलताना
वाटे सुंदर जीवन आहे
आपुल्याही वाटेवरूनी
की क्षणात निघूनी जाते
ती ही वाट सरुनी
तू सहजच बोलून जातेस
तू सहजच हसून जातेस
नी या मनवेड्याला प्रतिक्षा
कशाची लागून राहते?
-रोहन जगताप
कवी * रोहन जगताप 0 comments
Labels: marathi kavita, marathi poem, marathi prem kavita, Rohan Jagtap, तू सहजच, मराठी कविता, मराठी प्रेम कविता, रोहन जगताप
थांबण्यासाठी

थांबण्यासाठी दिवस अपूरा
जाताना पुरतील, काही क्षणही
गोल चक्र दिवसाचे हे
एका क्षणात जाईल निघून
थांबल्याने का कधी?
वेळ निघणार आहे शिवून?
थांबलेल्या दिवसात
काही विशेष असत नाही
पण जातानाच्या दिवसात
तसं बरंच काही घडतं
तासनतास कधी एकाच ठिकाणी
जणू थांबला आहे वेळ
तर कधी काही क्षणात
इथून तिथे
मोठा काळ लोटल्यासारखं
-रोहन जगताप
कवी * रोहन जगताप 0 comments
Labels: marathi kavita, marathi poem, Rohan Jagtap, थांबण्यासाठी, मराठी कविता, रोहन जगताप
