जेंव्हा हातात आली
पहिली बाईक स्वतःची
आठवतोय आनंद
वाटचाल जीवनाची
चालवलेली मनसोक्त
मित्रांना घेऊन
लायसन्सशिवाय
पोलिसांना चुकवून
पेट्रोलसाठी आईकडे
माझं पॆशे मागणं
तिने संपले म्हणून
थोडेसेच देणं
मग सुटायचा प्रश्न
मित्रांना भेटायचा
सापडत नाही पत्ता
आत्ता कुठेच ज्यांचा
मी मागे वळून बघताना
ते चिरकाल क्षण
पुन्हा जगताना
वाटतं त्या तिथे जावं
आणि त्यातच
आणखी काही पहावं
ते सोनेरी दिवस आयुष्याचे
वळून जीवनात माझ्या
जाताना असंच
कधी एका वळणावर
भेटली होतीस तू
आणि मला जाणिव होती तेंव्हाच
उद्या हा माझा नसणार
तू आज आहेस तशीच
पुन्हा कधीच नाही दिसणार
मित्रांनो दवडलेली वेळ
ना परतेल जीवनात कधीही
ना राहील काहीही कधीही
आणि आता माझ्या जीवनवाटेवर
आहे वर्दळ वाढली
ती माझी जुनी बाईक त्यात
नकळत मागे पडली
जाताना असंच
कधी एका वळणावर
भेटली होतीस तू
आणि मला जाणीव होती तेंव्हाच
उद्या हा माझा नसणार...
वळून जीवनात माझ्या
रोहन जगताप
पहिली बाईक स्वतःची
आठवतोय आनंद
वाटचाल जीवनाची
चालवलेली मनसोक्त
मित्रांना घेऊन
लायसन्सशिवाय
पोलिसांना चुकवून
पेट्रोलसाठी आईकडे
माझं पॆशे मागणं
तिने संपले म्हणून
थोडेसेच देणं
मग सुटायचा प्रश्न
मित्रांना भेटायचा
सापडत नाही पत्ता
आत्ता कुठेच ज्यांचा
मी मागे वळून बघताना
ते चिरकाल क्षण
पुन्हा जगताना
वाटतं त्या तिथे जावं
आणि त्यातच
आणखी काही पहावं
ते सोनेरी दिवस आयुष्याचे
वळून जीवनात माझ्या
जाताना असंच
कधी एका वळणावर
भेटली होतीस तू
आणि मला जाणिव होती तेंव्हाच
उद्या हा माझा नसणार
तू आज आहेस तशीच
पुन्हा कधीच नाही दिसणार
मित्रांनो दवडलेली वेळ
ना परतेल जीवनात कधीही
ना राहील काहीही कधीही
आणि आता माझ्या जीवनवाटेवर
आहे वर्दळ वाढली
ती माझी जुनी बाईक त्यात
नकळत मागे पडली
जाताना असंच
कधी एका वळणावर
भेटली होतीस तू
आणि मला जाणीव होती तेंव्हाच
उद्या हा माझा नसणार...
वळून जीवनात माझ्या
रोहन जगताप


0 comments:
Post a Comment