अन जीवन सरलं पुढे

अन जीवन सरलं पुढे

आपण जीवनात जवळ आलो
अनेक वेळा

अन जीवन सरलं पुढे

नजरेचे कटाक्ष हरवले तिथेच
त्या हरवलेल्या कटाक्षांनी
त्यांच्या मनात जाणलं जे ही
अन जीवन सरलं पुढे

अनेकवेळा गेलो
एका रस्त्यावरून
त्या रस्त्यांनाही वाटलं
आपण बोलावं म्हणून

मी थांबलो तिथेच
त्या रस्त्यावरती
आश्चर्याने बघत
सर्व क्षणांभोवती

अन रस्ता सरला पुढे
चालत गेला पुढे

0 comments:

 
© 2008 *By Templates*