तुमची जाहिरात या इथे कितीही दिवसांसाठी

३६५ दिवसांत या संकेतस्थळाला ला १०००० लोक भेट देतात. त्यामुळे आपण जर या इथे जाहिरात दिलीत तर त्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. जाहिरात मग ती कशाचीही असू शकते. पुस्तक, तुमचे स्वतःचे संकेतस्थळ, टुलबार, उत्पादने इ. इ. संपर्क - onlinemailme@gmail.com

तू माझ्यात

तू माझ्यात

वाटतं एकत्र असावं
तू आणि मी
निवांत एकांतात

स्पंदनांनी ऎकावी स्पंदनं
आणि मी ऎकावं
तू न बोलताच काही

नेत्रांतील तरल पाण्यात
विरघळेल तुझ्यात
सारं विश्व माझं

श्वासांनी घ्यावा श्वास
आणि मी द्यावं
तुज जन्मास काही

क्षणांनी थांबवावं क्षणांना
आणि मी थांबेन
नेहमीच तुझ्यासाठी

स्पर्शाने जाणावा स्पर्श
आणि मी जाणावं
तुझं हृदय सर्वस्व

रोहन जगताप

0 comments:

 
© 2008 *By Templates*