तुमची जाहिरात या इथे कितीही दिवसांसाठी

३६५ दिवसांत या संकेतस्थळाला ला १०००० लोक भेट देतात. त्यामुळे आपण जर या इथे जाहिरात दिलीत तर त्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. जाहिरात मग ती कशाचीही असू शकते. पुस्तक, तुमचे स्वतःचे संकेतस्थळ, टुलबार, उत्पादने इ. इ. संपर्क - onlinemailme@gmail.com

असेलच कोणीही

असेलच कोणीही
त्याच्या विश्वात तसंही

इच्छांनी सजवलेलं
एक सुंदर स्वप्न असेल
हृदयाच्या कोप-यातही
एक कोपरा असेल

मनातच मनानं लिहिलेली
अपूर्ण ओळ असेल
त्याची शाई अजूनही
काहीशी ओली असेल

असेलच कोणीही
त्याच्या विश्वात तसंही

स्वतःच्याच एकांतात जाणलेलं
एक प्रेम असेल
कुठेही नसलेलं त्याचं
एक अस्तित्त्व असेल

स्वतःहाच हृदयानं बांधलेला
ऋणानुबंध असेल
अलगद स्पर्शून गेलेला
तो आनंद असेल

रोहन जगताप

0 comments:

 
© 2008 *By Templates*