चाललंय नेहमीचं
नेहमीचंच चाललंय
शोधायचाय मार्ग, मला मिळवायचाय
दिवस आले गेले
मी पर्वा केली नाही पण
शोधायचाय मार्ग,मला मिळवायचाय
जर तुम्ही
वाचले तुमचे मन...
लागेल काही वेळ
समजण्यास सर्व
पण तुम्हाला, तुमच्या मनाचा
कळेल अर्थ
आणि तुमचे मनच
तुम्हाला ठेवेल वर
जेंव्हा सर्व खाली...
केवळ वळवा मानऽ
काहीच न करण्यापेक्षा
काही केलेलं बरं.
असं ऎकलंय मी, मी ऎकलंय...
सर्व शक्य आहे
मी नेहमीच जाणत आलोय पण...
शोधायचाय मार्ग, मला मिळवायचाय
जर तुम्ही
वाचले तुमचे मन...
लागेल काही वेळ
समजण्यास सर्वऽ
पण तुम्हाला, तुमच्या मनाचा
कळेल अर्थ
आणि... जेंव्हा तुम्ही वाचाल
त्या पुस्तकाचे, शेवटचे
कोरे पान...(येईल तुम्हाला भान)
केवळ वळवा मानऽ
(आणि आपल्या मनात बघा)
-रोहन जगताप
सर्व वाचकांना नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा!!! :-)
तुमची जाहिरात या इथे कितीही दिवसांसाठी
३६५ दिवसांत या संकेतस्थळाला ला १०००० लोक भेट देतात. त्यामुळे आपण जर या इथे जाहिरात दिलीत तर त्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. जाहिरात मग ती कशाचीही असू शकते. पुस्तक, तुमचे स्वतःचे संकेतस्थळ, टुलबार, उत्पादने इ. इ. संपर्क - onlinemailme@gmail.com
चाललंय नेहमीचं
कवी रोहन जगताप
Labels: marathi, marathi kavita, Rohan Jagtap, चाललंय नेहमीचं, मराठी, मराठी कविता, रोहन जगताप
Subscribe to:
Post Comments (Atom)

1 comments:
तुमचं हार्दिक अभिनंदन..तुमच्या कविता संग्रहासाठी..
पुढील कवितांसाठी शुभेच्छा !!
Post a Comment