या कवितेतील सगळे प्रसंग जसेच्या तसे लिहिले आहेत. आमचा खुळा संगणक मध्येच हँग झाल्याने, मला एवढी मोठी कविता दोनदा लिहावी लागली... :/
1.हं... मित्राचा फोन आला
‘ये इथं भेटायला...’
त्याच्याबरोबर गेलो त्याचं
लायसन्स काढायला
2.गेटमधून शिरताच दिसली
‘घाई’ सर्वांना
फार नंतर कळालं, माणसं
आली होती ‘घाईला’
3.माझा मित्र गेला एका खिडकीपाशी
त्याच्याकडेही बरोब्बर नव्हती
सुट्टी नोट कशी?
मी तरी म्हटलं उरलेले पॆसे माग
त्यानं तसं म्हणता ‘तिला’ आला राग
पण तिनं बोलण्याआधीच काही,
‘तसंच असतं' ‘रांग’ म्हणाली.
अरे! एवढाही ‘अ॒र्थ॒’ कळत नाही का?
असा ‘मतीतार्थ’ होता, त्यांच्या बोलण्याचा
4.मी बातमीत होतं ऎकलं
भ्रष्टाचारानं ‘देशाला पोखरलं’
पॆशांसाठी काम अडवलं
मी स्वतः नव्हतं अनुभवलं...
5.मित्राबरोबर गेलो त्याचं
लायसन्स काढायला
पहिल्यांदाच डोळ्यांनी बघितलं
भ्रष्टाचाराला...
6.एक मुलगा आला ‘एजन्ट’ घेऊन
हसत ऑफिसर गेला सर्वांसमोर बोलून,
‘हे काम आधिचे पॆसे देऊन...’
मग, 'आत्तातरी एवढं घ्या...' असं म्हणून
एजन्टनं अगदी गयावया करून
ऑफिसरच्या खिशात दिले पॆसे कोंबून
तिथं नवीन नव्हतं, कुणास काही
मनात ‘जीवनाचाच तो एक भाग राही’
7.काही केलं पाहिजे
‘मी सोडून’
पुढं आलं पाहिजे
‘मी सोडून’
घडवावी अद्दल
‘मी सोडून’
कुणीही यावं...
मी (मनातून) पाठिंबा देऊन
8.मला लागली होती तहान
उन्हानं गेलं होतं डोकं तापून
म्हणून आलो झाडाखाली अन्
बघितलं समोर, सहज म्हणून
9.तिथं भ्रष्टाचार रोखण्यास, रोवल्या होत्या पाट्या
कसं म्हणू ‘तिथल्या अनोळखी’, ओळींना मी खोट्या!?
पाटीखालीच रोवला होता भ्रष्टाचार
जणू अगदी नेहमीचाच शिष्टाचार
त्यात वेगळं असं नव्हतं काही,
(मनात) ‘तो जीवनाचाच एक भाग राही...’
10.तिथं काही नव्हतं माझं
काम स्वतःचं :)
(म्हणून) मला दिसत होतं तिथं
सगळंच गमतीचं
- रोहन जगताप
तुमची जाहिरात या इथे कितीही दिवसांसाठी
३६५ दिवसांत या संकेतस्थळाला ला १०००० लोक भेट देतात. त्यामुळे आपण जर या इथे जाहिरात दिलीत तर त्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. जाहिरात मग ती कशाचीही असू शकते. पुस्तक, तुमचे स्वतःचे संकेतस्थळ, टुलबार, उत्पादने इ. इ. संपर्क - onlinemailme@gmail.com
पहिल्यांदाच बघितलं...
कवी रोहन जगताप
Labels: marathi, marathi kavita, Rohan Jagtap, पहिल्यांदाच बघितलं..., मराठी, मराठी कविता, रोहन जगताप
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment