पुन्हा एकदा नवी सकाळ
नको म्हटलं प्रकाशाला
पांघरूनाखाली दिवस दडवून
ये म्हटलं रात्रीला
मी तसाच पडून राहिलो
वेळ पुढे ढकलला
पण शेवटी पांघरूनातही
क्षणात दिवस उगवला
ते चुरगळलेलं पांघरून
टाकलं मी बाजूला
निमेषात लक्षात आली
कामं दिवसाला
मला जीवनात नको आहे
ओझं गाठीला
स्वर्गीय स्वप्नातूनच मला
जायचंय स्वर्गाला
सकाळी उठताच हातात येतो पेपर
खरं जीवन सांगू लागते खबर
आयुष्याभोवती फिरते नजर
चित-पटांत सगळी उत्तरं...
(पण) चालत राहण्याशिवाय
काही काम ना ‘हाताला’
जुनं तोंड धुऊन सुरूवात
केली कामाला
- रोहन जगताप
तुमची जाहिरात या इथे कितीही दिवसांसाठी
३६५ दिवसांत या संकेतस्थळाला ला १०००० लोक भेट देतात. त्यामुळे आपण जर या इथे जाहिरात दिलीत तर त्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. जाहिरात मग ती कशाचीही असू शकते. पुस्तक, तुमचे स्वतःचे संकेतस्थळ, टुलबार, उत्पादने इ. इ. संपर्क - onlinemailme@gmail.com
पुन्हा एकदा...
कवी रोहन जगताप
Labels: marathi, marathi kavita, Rohan Jagtap, पुन्हा एकदा..., मराठी, मराठी कविता, रोहन जगताप
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment